April 2007

You are currently browsing the monthly archive for April 2007.

Published in Vivek Saptahik, Divali issue 2006.

फ्युजन म्युझिक – कनफ्युजन का संगीतसंगम?

दोन किंवा त्याहूनही अधिक संगीत प्रकारांचे एकमेकांशी संभाषण आणि यातून झालेला आविषकार म्हणजेचफ्युजन म्युझिक. या प्रक्रीयेचा प्रदीर्घ इतिहास असला तरी फ्युजन म्युझिक हे नाव अलिकडेच म्हणजे गेल्या तीन-चार दशकातच प्रचलित झाले. सर्व प्रथम ही संज्ञा पाश्चात्य संगीत प्रकारांमधील देवाण-घेवाण दर्शवण्या करीता वापरण्यात आली. जॅझ-रॉक फ्युजन हे याचे एक उदाहरण.

या संपूर्ण काळात, रसिकांचे कान वेधून घेण्यासाठी रेकॉर्ड कंपन्यांनीही या नावाचा उपयोग करून नवीन रेकॉर्डस बाजारात आणल्या. आपल्या मालाचा खप वाढविण्याकरीता देखील काही कंपन्यांनी असेही संगीताचे प्रयोग ध्वनिमुद्रित केले की जे फ्युजन म्हणून प्रसिद्ध झाले पण ज्यात फार काही तथ्य नव्हते.

फ्युजन म्युझिकचा जगभर प्रसार झाल्यामुळे आजच्या पिढीतील भारतीय कलाकारांवर या प्रयोगांचा प्रभाव पडला आहे. म्हणूनच आज आपण हिंदुस्तानी आणि कर्नाटक शास्त्रोक्त संगीतकारांना इतर देशातीलच नव्हे तर भारतातील पिआनो, गिटार, सारखी पाश्चात्य वाद्य वाजवणार्‍या कलाकारांबरोबर प्रयोग करताना पाहातो आणि ऐकतो.

Read the rest of this entry »